तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Bihar Assembly election victory बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित रालोआने घवघवीत यश मिळून सत्ता प्राप्त केल्यानेराळेगाव शहरातील स्थानिक भाजपा नेते व कार्यकर्त्यांनीशुकरवारी कार्यालय परिसरात एकत्रित येऊन व फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला.या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बिहार निवडणुकीत मिळालेल्या विजयानिमित्त सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी कार्यप्रणालीवर ठेवलेल्या जनतेच्या विश्वासामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.या कार्यक्रमासाठी भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला.