राळेगावात कापूस खरेदीचा श्रीगणेशा

16 Nov 2025 15:14:03
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
ralegaon-cotton-purchase : सीसीआयच्या वतीने आजपासून राळेगाव येथील केंद्रावर हमीदराने कापूस खरेदीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 300 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून शेतकèयांच्या कापसातील आर्द्रतेनुसार किमान 7700 ते 8100 रुपये भाव देण्यात आला. दरम्यान तालुक्यात गुरुवारपर्यंत राळेगाव केंद्रावर 9600 व खैरी केंद्रावर 3700 शेतकèयांनी नोंदणी केल्याची माहिती मिळाली.
 

y16Nov-Muhurt 
 
 
 
सीसीआयकडून शासनाच्या आधारभूत किमतीने कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान अ‍ॅप’वर आभासी नोंदणी सुरू आहे. दिवाळीनंतरही पावसाचा जोर राहिल्याने कापूस खरेदी सुरू केली नव्हती त्यानंतर उघड मिळाल्याने 13 नोव्हेंबरपासून राळेगाव येथे सीसीआयतर्फे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी 300 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आल्याने शेतकèयांनी समाधान व्यक्त केले.
शेतकèयांनी केंद्रावर सुकलेला कापूस आणावा
 
 
खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणताना तो पुरेसा वाळवूनच न्यावा जास्त आद्रतेच्या कारणामुळे तो रिजेक्ट होणार नाही याची शेतकèयांनी दक्षता घ्यावी. आठ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असेल तर शेतकèयांना पूर्ण हमीदराचा लाभ होऊ शकतो. कापूस दोन-तीन दिवस चांगला वाळूनच शेतकèयांनी खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहन सीसीआयचे अधिकारी राजकुमार बैरवा यांनी केले.
Powered By Sangraha 9.0