रणवीर सिंगचे टेन्शन वाढले?

16 Nov 2025 12:15:41
मुंबई,
Ranveer Singh वर्ष २०२५च्या अखेरच्या महिन्यांमध्ये मोठमोठ्या चित्रपटांची रेलचेल असताना रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये रणवीरसोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका आहे. अक्षय खन्नाचा लूक अद्याप गुप्त ठेवण्यात आला असला, तरी उर्वरित कलाकारांचे फर्स्ट लुक आधीच समोर आले आहेत.
 


Ranveer Singh 
१२ नोव्हेंबर रोजी भव्य सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्याची तयारी होती. तब्बल दोन हजार चाहत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात येणार होता. रणवीरच्या करिष्माई व्यक्तिमत्त्वामुळे आणि चित्रपटाबद्दल आधीपासूनच निर्माण झालेल्या उत्साहामुळे निर्माते कोणतीही कमी ठेवू इच्छित नव्हते. मात्र दिल्लीतील अलीकडील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.याशिवाय ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांच्या अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यानंतर चित्रपटाच्या टीमने त्यांच्या सन्मानार्थ आणि उद्योगातील वातावरण लक्षात घेऊन कार्यक्रम स्थगित करणे उचित असल्याचे मानले. त्यामुळे ट्रेलरचे अनावरण तात्पुरते थांबवण्यात आले होते.
 
 
आता जिओ Ranveer Singh स्टुडिओज आणि बी६२ स्टुडिओज यांनी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘धुरंधर’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्याची अंतिम तयारी पूर्ण केली आहे. एस.एस. राजामौलींच्या ‘वाराणसी’ नंतर वर्षातील दुसरा सर्वात मोठा ट्रेलर लाँच म्हणून ‘धुरंधर’ कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उच्च दर्जाचे अ‍ॅक्शन दृश्ये, तगडे कलाकार आणि भव्य प्रमाणात होणारा ट्रेलर लाँच यामुळे ‘धुरंधर’ने प्रदर्शना अगोदरच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाच्या टीमकडून आता १८ नोव्हेंबरचा दिवस अधिक तेजस्वी करण्याची तयारी सुरू असून, चाहत्यांना धमाकेदार ट्रेलरची आतुरता लागली आहे.
Powered By Sangraha 9.0