बुलढाणा,
sangeeta-archit-hirole : नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने डॉ. संगीता अर्चित हिरोळे यांचा उमेदवारी अर्ज दि. १५ नोव्हेंबर रोजी दाखल केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढविली आहे. बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी वंचितने यापूर्वी तिरंगी लढतीत नजमुन्नीसा मो. सज्जाद विजयी झाल्या होत्या. यंदा काँग्रेससोबत आघाडी कडून नगराध्यक्ष पदाचा हट्ट वंचितने धरला असून बुलढाण्याचे इंडियण पेट्रोल व गॅस एजन्सीचे मालक अमोल हिरोळे यांची सुन डॉ. संगीता अर्चित हिरोळे वंचितच्या उमेदवार असणार आहेत.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि वंचितचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीची घोषणा केली. परंतू वंचितच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अमोल हिरोळे यांना प्रमुख पदाधिकार्यांनी निवडणूक लढण्यासाठी गळ घातल्याचे समजते. या राजकीय घडामोडीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांना या उमेदवारीसाठी आग्रही राहण्याची भूमिका वठवावी लागणार आहे. अमोल हिरोळे यांचा समाजातील विविध वर्गामध्ये नावलौकिक आहे. त्यांचे सर्वच क्षेत्रातील आणि जाती-धर्मातील लोकांशी स्नेहबंध आहेत. यांच्या बंगल्यावर गर्दी वाढली आहे,