मुंबई,
BJP राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसेच पक्षांतराची गती वाढल्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर विद्याताई निर्मले यांनी भाजपात प्रवेश केला असून, त्यांच्या सोबत माजी नगरसेविका शितल मंडारी यांनी देखील भाजपात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपात BJP झालेल्या या जोरदार इनकमिंगमुळे स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपची ताकद अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला फटका बसल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. याशिवाय भाजपने शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसला देखील धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णानी आणि शिवसेना शिंदे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय जोशी यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.भाजपचे उल्हासनगर प्रचार प्रमुख प्रदीप रामचंदानी यांनी या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, विद्याताई निर्मले, शितल मंडारी, गोदुमल कृष्णानी आणि विजय जोशी यांच्यासह अनेक स्थानिक नेते भाजपात सामील झाले आहेत. यामुळे उल्हासनगरमधील राजकीय समीकरण बदलले आहे आणि आगामी निवडणुकीत भाजपाला ताकद मिळणार आहे.
शितल मंडारी यांनीही पक्षप्रवेशाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पक्षात गळचेपी नव्हती, मात्र केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यक्षमतेमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या निर्णयामागे कोणावरही नाराजी नव्हती आणि मुख्य उद्देश कल्याण पूर्वेच्या विकासासाठी काम करणे हा आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार असून, मतमोजणी तीन डिसेंबरला होईल. या पार्श्वभूमीवर पक्षांतर आणि स्थानिक राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. उल्हासनगरमधील या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा आव्हान निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसते.