वर्धा,
minor-girl-kidnapped : अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांच्या चमूने अमरावती येथून हुडकून काढत ऐफाज उर्फ पापा अन्सार खॉ पठाण (१९) रा. निशानपुरा वार्ड हिंगणघाट यालाअटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलीला अज्ञाताने पळून नेल्याची तक्रार हिंगणघाट पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या चमूने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या चमूने अमरावती गाठले. या प्रकरणातील आरोपीस मोठ्या शिताफीने अमरावतीच्या इबाल कॉलनी येथून अटक केली. त्याने पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीबाबत विचारपूस केली असता मुलगी त्याच्यासोबत राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका केली. तसेच ऐफाज उर्फ पापा पठाण याला अटक करून पुढील कारवाईसाठी हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात सुभाष राऊत, दिवाकर परिमल, संजय राठोड, नितेश मेश्राम, शबाना शेख, नवनाथ मुंडे, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, अनुप कावळे यांनी केली.