श्री सखाराम महाराज यात्रा महोत्सवाला सुरुवात

16 Nov 2025 19:06:20
रिसोड, 
shri-sakharam-maharaj-yatra : श्री सखाराम महाराज यांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र लोणी येथील श्री सखाराम महाराज समाधी मंदिरामध्ये १५ नोव्हेंबर रोजी गरुड खांब पूजन व १६ नोव्हेंबर रोजी चांदनी पूजन तसेच स्थापना करून यात्रा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
 
 
 
JK
 
 
 
श्री सखाराम महाराज संस्थांनचे वंशज डॉ. सखा महाराज यांनी गरुड खांब पूजन करून विधिवत स्थापना केली. यावेळी गोविंद महाराज, कल्याण महाराज व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. गरुड खांब पूजन केल्यानंतर सुहासिनी हळद कुंकवाचे हातवे लावून भाविक भक्त मोठ्या भक्ती भावाने गरुड खांबाची स्थापना करतात. गरुड खांब पूजनाने श्री सखाराम महाराज पुण्यतिथीच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. यात्रेतील दुकानदारांचे जागावाटप, रथोत्सवाच्या रथाची स्वच्छता, महापंगत स्वयंपाकाची तयारी आदी कामे प्रामुख्याने सुरू झाली. श्री सखाराम महाराजांची पुण्यतिथी व महापंगत १९ नोव्हेंबर रोजी होत आहे. सोमवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता महापंगत पुरीच्या प्रसादाला सुरुवात होणार आहे. ५१ क्विंटलची पुरी, ५० क्विंटलची भाजी, ४० क्विंटलचा शिरा हा प्रसाद सोमवारपासून बुधवारपर्यंत अहोरात्र भाविक भक्त तयार करतात.
Powered By Sangraha 9.0