आर्णी येथे सीसीआयची कापूस खरेदीचा शुभारंभ

16 Nov 2025 15:11:51
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
arni-ccis-cotton-purchase : खरीप हंगामातील कापूस विक्रीसाठी ज्या शेतकèयांनी ऑनलाईन नोंदणी केली अशा शेतकèयांकडील सीसीआयने कापूस खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल आडे, उपसभापती परसराम राठोड, सीसीआयचे केंद्र प्रमुख दिनेश तेली यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते लक्ष्मण चव्हाण बोरगाव, रोहित राठोड नवनगर हेटी, शपिक हिराणी यांच्यासह आदी शेतकèयांचा शेला, शीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व कापसाच्या गाडीचे पूजन करून कापूस खरेदीस प्रारंभ झाला.
 
 
y16Nov-Kapus
 
यावेळी बाजार समितीचे सभापती अनिल आडे म्हणाले, कापूस नोंदणीत ज्या शेतकèयांच्या त्रुटी आहे त्यांनी तत्काळ बाजार समिती कार्यालयांशी संपर्क करून दुरूस्ती करून घ्यावी. जेणेकरून कापूस विक्री करताना अडचण येणार नाही. त्यानंतर सीसीआयचे केंद्रप्रमुख दिनेश तेली यांनी सांगितले की, शेतकèयांनी स्लॉट बुकींग केल्याशिवाय शेतकèयांनी कापूस हा शेतमाल विक्रीला आणू नये.
 
 
कृउ बाजार समिती येथील कापूस खरेदी शुभारंभाच्या कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन बाजार समितीचे सचिव विशाल राठोड यांनी केले. यावेळी उमेश कोठारी, उमेश ठाकरे, दीपक बुटले, देवेंद्र पाटील, अजय गादेवार, प्रदीप मसराम, गणेश राठोड, गफुर शहा यांच्यासह संचालक, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0