तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Tata Community Health Run : सर्वांना धावण्याची आवड निर्माण व्हावी, तसेच आरोग्यविषयक जागरूकता वाढावी. या उद्देशाने रविवार, 16 नोव्हेंबर रोजी स्ट्राईड्स आयोजक टाटा अल्ट्रा मॅरेथॉन लोणावळा, अॅथलेटिक असोसिएशन यवतमाळ, शारीरिक शिक्षक संघटना यवतमाळ आणि कॉटन सिटी रनर्स फाउंडेशन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टाटा कम्युनिटी हेल्थ रन’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात एकूण 669 धावकांनी नोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 5 किमी रनला नेहरू स्टेडियम येथून मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. मुख्य अतिथी तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, स्ट्राईड्सचे संचालक व आंतरराष्ट्रीय धावपटू दीपक लोंढे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

नेहरू स्टेडियम तहसील चौक, पाचकंदील चौक, एलआयसी चौक, पोस्ट ऑफिस चौक, स्टेट बँक चौक (यू-टर्न), परत त्याचमार्गे नेहरू स्टेडियम फिनिश पॉइंटपर्यंत होता. ज्यांनी धाव पूर्ण केली त्या सर्व धावकांना स्ट्राईड्सतर्फे टाटा अल्ट्रा मॅरेथॉन टी-शर्ट प्रदान करण्यात आले. सर्व सहभागींसाठी आरोग्यवर्धक फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. धावकांशी संवाद साधताना दीपक लोंढे यांनी टाटा अल्ट्रा मॅरेथॉन लोणावळा विषयी माहिती दिली.
वाहतूक पोलिसांचे सहकार्य
मॅराथॉनच्या मार्गावर यवतमाळ जिल्हा वाहतूक पोलिसांनी उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था ठेवत धावकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली. यामुळे संपूर्ण रन निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडला.
हेल्थ मॅराथॉन 4 थी आवृत्ती
कॉटन सिटी रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. परेश गंडेचा, सचिव डॉ. शरद राखुंडे तसेच अॅथलेटिक असोसिएशनचे राजू जॉन यांनी आगामी 4 जानेवारी 2026 रोजी होणाèया यवतमाळ हेल्थ मॅराथॉनविषयी माहिती दिली.
यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान
सुशील इनामदार, समन्वयक स्ट्राईड्स, अमोल ढोणे, प्रेमेंद्र रामपूरकर, मनीषा आखरे, जितेंद्र सातपुते, प्रा. सुभाष डोंगरे, जय मिरकुटे यांनी योगदान दिले. तसेच एम.आर. संघटना यवतमाळ यांचेही सहकार्य लाभले.