भीषण अपघात: खाण पुल कोसळल्यामुळे किमान ३२ जणांचा मृत्यू,धक्कादायक VIDEO

17 Nov 2025 10:42:13
काँगो, 
mining-bridge-collapses-in-congo आफ्रिकन देश काँगोमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. वृत्तानुसार, खाणीतील पूल कोसळून किमान ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय काँगोमध्ये शनिवारी पूल कोसळल्याची घटना घडली. प्रांतीय गृहमंत्री रॉय कोम्बा मायोंडे यांनी मृतांची संख्या ३२ इतकी सांगितली आहे, परंतु अहवालात असे म्हटले आहे की किमान ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

mining-bridge-collapses-in-congo 
 
वृत्तानुसार, तांबे आणि कोबाल्ट खाणीत जास्त गर्दीमुळे पूल कोसळल्याने मृतांची संख्या वाढली आहे. लुआलाबा प्रांतातील मुलोंडो येथील कलांडो खाणीतील पूल शनिवारी कोसळल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. mining-bridge-collapses-in-congo मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रवेशावर कडक बंदी असूनही बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांनी खाणीत प्रवेश केला.
सौजन्य : सोशल मीडिया 
Powered By Sangraha 9.0