भाजपातर्फे अनिल केंदळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

17 Nov 2025 17:06:46
वाशीम, 
Anil Kendale is the BJP candidate भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाशीम नगराध्यक्षपदासाठी समाजसेवक सर्वपरिचीत चेहरा अनिल केंदळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करुन आज, १७ नोव्हेंबर रोजी हजारेाच्या उपस्थितीत त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे दाखल केला. वाशीम जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, मंगरुळनाथ, कारंजा या चार नगर परिषद व मालेगाव नगर पंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. वाशीम नगराध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण राखीव आहे. वाशीम नगराध्यक्षपदासाठी भाजपाची उमेदवारी मिळावी यासाठी डझनभर उमेदवारांनी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली. परंतु, जनतेचा चेहरा म्हणून सर्वपरिचीत स्वच्छ प्रतिमा असलेले अनिल केंदळे यांना भाजपाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. वाशीम नगर परिषदेमध्ये एकूण ७५०७० मतदार असून, हे मतदार नगरसेवकासह, नगराध्यक्षाचे भवितव्य ठरवणार आहेत. अनिल केंदळे यांच्या उमेदवारीने वाशीममध्ये भाजपाची बाजू भक्कम झाली असून, तेच विजयी होतील, असे भाकीत आतापासून मतदार करीत आहेत. वाशीम नगर परिषदेसाठी एक नगराध्यक्ष व ३१ नगरसेवक पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
 
 
Anil Kendale is the BJP candidate
 
 
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अनिल केंदळे यांनी वाशीमचे आराध्य दैवत श्री बालाजी चे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर ही रॅली पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहचली. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढून नगर परिषद कार्यालय येथे पोहचून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आ. श्याम खोडे, भाजपा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे, माजी नगराध्यक्ष अशोक हेडा, माधवराव अंभोरे, माजी सभापती राहुल तुपसांडे, रितेश मलिक, बाळू मुुरकूटे, रामा इंगळे यांच्यासह भाजपा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व केंदळे यांचे समर्थकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0