ऑपरेशन ‘सिंदूर २’ फक्त ट्रेलर!

17 Nov 2025 12:51:25
नवी दिल्ली,
Army Chief Dwivedi's warning to Pakistan दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका मांडताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले की भारतीय लष्करासाठी दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणारे मालक हे दोन्ही सारखेच आहेत. दहशतवादाला कोणत्याही स्वरूपात प्रोत्साहन देणाऱ्यांना आम्ही कठोर प्रत्युत्तर देऊ,” असे ते चाणक्य संरक्षण संवादात बोलताना म्हणाले. जनरल द्विवेदी यांनी ऑपरेशन ‘सिंदूर २’चा उल्लेख करत पाकिस्तानला थेट इशारा दिला. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला तर भारत शांत बसणार नाही. हे तर फक्त ८८ तासांत दाखवलेले ट्रेलर होते,”असे वक्तव्य त्यांनी केले. पाकिस्तानने शांतता प्रक्रियेचा स्वीकार केला नाही तर होणाऱ्या परिणामांना तयार राहावे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
 
 
Army Chief Dwivedi
भार-चीन सीमेसंदर्भात बोलताना ते म्हणाले की गेल्या वर्षभरात अनेक सकारात्मक बदल झाले असून दोन्ही देशांच्या नेतृत्वात संवाद वाढला आहे. “विवाद कमी करण्यासाठी संवादच मार्ग आहे. संरक्षणमंत्र्यांच्या भेटीदरम्यानही अधिक संवाद साधावा यावर दोन्ही बाजूंचे मत एकसारखे असल्याचे दिसले,” असे त्यांनी सांगितले. लष्करप्रमुखांनी जम्मू–काश्मीरमधील स्थितीवर समाधान व्यक्त केले. ५ ऑगस्ट २०१९ नंतर काश्मीरमध्ये राजकीय स्पष्टता निर्माण झाली आहे. शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत. शाळांची संख्या २१ टक्क्यांनी वाढली आहे. लोक भारताच्या प्रत्येक भागात जाऊन काम करण्यास उत्सुक आहेत आणि मागे गेलेले अनेकजण परतण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, असे ते म्हणाले.
 
 
 
त्यांनी दहशतवादातील घडामोडींचाही उल्लेख केला. “यंदा ३१ दहशतवादी मारले गेले असून त्यापैकी २१ जण पाकिस्तानी आहेत. दगडफेक जवळपास थांबली आहे. पहलगाम घटनेनंतरही अमरनाथ यात्रेवर मोठ्या संख्येने भाविक आले. लोकांची मानसिकता बदलत असून भारताबद्दल आकर्षण वाढत आहे, पाकिस्तानबद्दल कमी होत आहे, असे त्यांनी सांगितले. म्यानमारमधील अस्थिरतेचा उल्लेख करत जनरल द्विवेदी म्हणाले, “शेजारी देशांतील समस्या आपल्या सीमांवर परिणाम घडवतात. म्यानमारमधून आलेल्या लोकांना आम्ही सुरक्षित परतण्यास मदत करत आहोत. हा मुद्दा लवकर सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
Powered By Sangraha 9.0