आता ‘फॅक्टरीत बनणार बाळ?

17 Nov 2025 12:37:11
नवी दिल्ली,
Baby to be made in a factory जगभरात बायोटेक क्षेत्रात गाजलेली एक गुप्त क्रांती आता सार्वजनिक झाली आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन आणि त्यांचे पार्टनर ऑलिव्हर मुल्हेरिन तसेच कॉइनबेसचे सीईओ ब्रायन आर्मस्ट्राँग यांनी ‘प्रिव्हेंटिव्ह’ नावाच्या बायोटेक स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या स्टार्टअपचा दावा असा आहे की भविष्यात पालकांना ‘जीन-एडिट’ केलेली मुले मिळतील, जी जन्मापूर्वीच कॅन्सर, हृदयरोग आणि इतर गंभीर अनुवांशिक आजारांपासून मुक्त असतील.
 
 
Baby to be made in a factory
‘प्रिव्हेंटिव्ह’ स्टार्टअप CRISPR(क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिंड्रोमिक रिपीट्स) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भातील डीएनएमधील रोगकारक दोष काढण्याचे काम करणार आहे. यामुळे बाळ जन्माला येण्यापूर्वीच सुरक्षित राहील. या कल्पनेला समर्थक आशेचा किरण मानतात, तर टीकाकार काळजी व्यक्त करतात. कारण डीएनएमध्ये केलेला बदल कायमस्वरूपी राहतो आणि लहानशी चूक भविष्यातील पिढ्यांसाठी धोका ठरू शकते. यामध्ये विशेष चिंता आहे की, या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून श्रीमंत पालक बाळांची उंची, रंग किंवा बुद्धिमत्ता निवडू शकतील.
 
 
 
यामुळे समाजात जैविकदृष्ट्या दरी निर्माण होण्याची भीती आहे, आणि बाळ ‘कारखान्यात तयार केलेल्या’ प्रमाणे दिसू शकतील, असे तज्ञांचे मत आहे. जरी स्टार्टअप पारदर्शकतेचे आश्वासन देत असले, तरी जागतिक नियमांशिवाय पुढे जाणे धोकादायक ठरू शकते. या गुंतवणुकीमुळे वैद्यकीय क्रांती घडेल की सामाजिक आणि नैतिक संकट निर्माण होईल, हे लवकरच स्पष्ट होईल. जागतिक स्तरावर ‘डिझायनर बेबीज’ संदर्भात चिंता वाढत असून, तंत्रज्ञानाची जबाबदारी आणि नैतिक मर्यादा यावर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Powered By Sangraha 9.0