उत्तर प्रदेश,
Baghpat rape case उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील खिवई गावातून समोर आलेल्या भयानक घटनेत, पतीच्या जुगारात पराभव झाल्याने पत्नीवर तिच्या नवऱ्याच्या मित्रांकडून बलात्कार केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. घटनेनंतर पीडितेने तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनुसार, ८ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यापैकी काही आरोपींना पीडितेने ओळखले आहे. गुन्हा बिनोली पोलीस ठाण्यात नोंदवला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी पीडितेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना केली आहेत.घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल, Baghpat rape case असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.ही घटना सामाजिक आणि कौटुंबिक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून याबाबत जनजागृती सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.