भंडारा जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूक!

17 Nov 2025 21:00:28
तभा वृत्तसेवा
भंडारा,
Bhandara municipal elections, जिल्ह्यातील चार नगर परिषदांच्या अध्यक्ष आणि सदस्य पदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष आणि सदस्य पदासाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. जिल्ह्यातील चार नगर परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी एकूण 70 तर सदस्य पदासाठी 925 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी, भंडारा, तुमसर आणि साकोली या नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि सदस्य पदासाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. चारही नगरपरिषदा मिळून 49 प्रभागातून 100 नगरसेवक आणि 4 नगराध्यक्ष निवडायचे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
 

Bhandara municipal elections 
Powered By Sangraha 9.0