वर्धा जिल्ह्यात भाजपाने उघडले पत्ते

17 Nov 2025 10:16:05
वर्धा,
bjp-in-wardha-district वर्धेत भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढते आहे तर महाविकास आघाडी एकत्र मैदानात उतरली आहे. आज सकाळपर्यँत अतिशय गुप्तता पाळली. दरम्यान, भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यातील सहाही नगर पालिकेसाठी नगराध्यक्ष पदाची नावं जाहीर केले.
 
 
bjp-in-wardha-district
 
वर्धा येथे नीलेश किटे, हिंगणघाट: नयना तुळसकर, आर्वी : स्वाती गुल्हाने, पुलगाव : ममता बडगे तर देवळी येथे शोभा तडस यांना उमेदवारी जाहीर झाली. देवळी येथील भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शोभा तडस यांनी काल रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उर्वरित नगराध्यक्षपदाचे उमेदवार दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करतील. bjp-in-wardha-district वर्धेत शिवसेनेचे उमेदवार रविकांत बालपांडे यांनी अर्ज दाखल केला तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडून सुधीर पांगुळ यांना तिकीट दिल्याची चर्चा आहे. वर्धेत तेली आणि कुणबी याच आधारावर उमेदवारी दिल्याचे चित्र आहे.
Powered By Sangraha 9.0