नरेंद्र सुरकार
सिंदी
Brazil cotton import भारत सरकारने कापसाच्या आयातीला डिसेंबरपर्यंत परवानगी दिल्यामुळे आणि अमेरिकेने भरमसाठ टेरीफ लावल्यामुळे ब्राझील आणि चीन मधील कापसाची सतत आयात होणार आहे. परिणामी, देशातील उच्च दर्जाच्या कापसाला नवीन वर्षात भाव मिळेल, अशी चालू वर्षांत विदर्भातील पांढर्या सोनाचे मूल्य वाढण्याची शयता दिसत नाही.जागतिक बाजारपेठेचा विचार करता अमेरिकेच्या हेकेखोरवृत्तीमुळे तेथील कच्चा कापूस भारतातील कापड व्यवसायिकांना पाहिजे असला तरी मिळणार नाही. उलट ब्राझील आणि चीन देशात भरपूर कापूस पिकल्यामुळे तसेच भारताने व्यापार समझोता केल्याने तेथील कापूस भारतात मोठ्या प्रमाणात येण्याची शयता आहे. त्यामुळे येथील कापसाला मागणी नगण्य राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
देशात विशेष करून विदर्भात अत्युच्च दर्जाचा कापूस पिकतो. आंध्रा, गुजरात आणि मध्यप्रदेशच्या काही भागात कापूस नगदी पीक समजल्या जाते. पंजाब प्रांताच्या आबोहर आणि फाजिल्का तालुयात देखील कापूस पिकतो. मात्र, त्या कापसाचे स्टेपल हलया दर्जाचे असते. परिणामी, पंजाबच्या कापसाला बाजारपेठेत फारसे महत्व नसते. पण, वर्धा, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील कापसाला गिरणी मालक प्राधान्य देतात. सिंदी रेल्वे सबझोनमधील कापसाला फेडरेशनच्या काळात सर्वाधिक पसंती दिल्या जात होती.
यावर्षी या Brazil cotton import पट्ट्यातील कापसावर रोगांचा प्रकोप नाममात्र दिसतो. पण, व्यापार्यांना तसेच कापड व्यावसायिकांना २०२५ च्या अखेरपर्यंत आयात परवाना मिळाल्याने व कापूस उत्पादकांची आर्थिक अडचण बघता कापसाचे भाव वाढण्याची शयता क्षीण आहे. सोयाबीनच्या कमी किंवा नगण्य उत्पन्नामुळे व्यथित कापूस उत्पादक शेतकरी हा ज्वलनशील शेतमाल साठवून ठेवू शकत नाही. शेतकर्यांनी पर्यायी पिकाचा शोध घ्यावा किंवा जोडधंद्याला प्राधान्य द्यावे, यातच शेतकर्यांचे हित असल्याचे मत अनेक कृषी तज्ज्ञांनी व्यत केले आहे.