अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा : जिल्हा शल्य चिकित्सक दतात्रय बिराजदार

17 Nov 2025 19:59:19
बुलढाणा,
Buldhana District Hospital मृत्यूनंतरही अवयवदानाद्वारे अनेकांचे प्राण वाचू शकतात अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांनी केले.येथील जिल्हा रुग्णालय आणि बजाज हॉस्पिटल, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती कार्यक्रम दि. १२ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजामध्ये अवयवदानाबाबत जागृती वाढविणे आणि त्याचे महत्त्व समजावून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
 

Buldhana District Hospital 
या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. घोटे, नेत्रतज्ञ डॉ. रवी शिंदे, बजाज हॉस्पिटल, संभाजीनगर येथील डॉ. रोडे, (बाह्य रुग्ण विभाग) वैद्यकीय अधिकारी डॉ. घोंगटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, नेत्र समुपदेशक योगेश सिरसाट, जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात तज्ञांनी अवयवदानाचे सामाजिक, वैद्यकीय आणि मानवी मूल्यांवरील महत्त्व पटवून दिले. अवयवदानाबाबतच्या विविध प्रक्रियांची माहिती, त्यावरील गैरसमज दूर करणे आणि सामान्य जनतेमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे मार्गदर्शनही कार्यक्रमात करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0