cold-wave-in-vidarbha विदर्भातील अनेक भागांत थंडीचे प्रमाण वाढत आहे आणि नागपूरमध्ये सोमवारी पहाटे किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. सकाळी हुडहुडी भरवणारी थंडी असून दिवसभर वातावरण गारठलेले राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच हवामान विभागाने राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
रविवारी संध्याकाळी शहरातील अनेक भागांत नागरिक शेकोटी जवळ उब घेण्यासाठी जमलेले दिसले. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात सतत घट होत आहे. cold-wave-in-vidarbha उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवतो, मात्र नागपूरसह विदर्भातील हवामानही गारठलेले आहे. थंडीत वाढत्या प्रमाणामुळे नागपुरातील तिबेटियन बाजारात उबदार कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. सुटीचा दिवस असल्याने नागरिक सायंकाळनंतर थंडीत फिरण्यासाठी बाहेर पडले आणि थंडीत फिरण्याचा आनंद घेतला.
हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत थंडीचे प्रमाण विदर्भात टिकून राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे आणि आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे.