आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक

17 Nov 2025 12:08:36
मुंबई,
Condolences to Vishwas Nangre Patil महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या आई मंगल नारायण नांगरे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. याबाबत माहिती सांगलीच्या शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजीत देशमुख यांनी फेसबुकवर पोस्ट करून दिली, तर विश्वास नांगरे पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, मला माहित आहे आता आईची हाक पुन्हा कधी ऐकायला मिळणार नाही. पण तिने जोडलेल्या असंख्य ऋणानुबंधांचा गोडवा आजन्म राहणार आहे. त्यांच्या भावनांमध्ये आईच्या मायेची आणि संस्कारांची आठवण नेहमी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
vishwas nangre patil mother
संग्रहित फोटो 
सत्यजीत देशमुख यांनीही दु:ख व्यक्त करत म्हटले की, आज मन अत्यंत जड आहे. आमच्या सर्वांच्या लाडक्या, माझे मित्र विश्वास नांगरे पाटील आणि विकास नांगरे पाटील यांच्या मातोश्री मंगलकाकी नांगरे पाटील आपल्यातून गेल्या. त्यांच्या शांत स्वभाव, संस्कार आणि निस्वार्थ मायेची आठवण आयुष्यभर राहणार आहे. अशा माणसांचं निधन म्हणजे फक्त मृत्यू नाही, हा एका युगाचा हळवा शेवट आहे. ईश्वर त्यांच्या दिव्य आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबाला या कठीण प्रसंगातून धीर, आधार आणि सामर्थ्य मिळो. विश्वास नांगरे पाटील आणि त्यांच्या मित्रांनी आईच्या आठवणींना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कुटुंबाच्या जीवनातील योगदानाचा गौरव केला.
Powered By Sangraha 9.0