नागपूरची ईश्वरी पांडे २५व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंगमध्ये तिहेरी पदक विजेती

17 Nov 2025 17:26:03
हैदराबाद,
Eshwari Pandey, २५व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये नागपूरच्या ईश्वरी पांडेने तिहेरी पदक जिंकून देशभरातील जलतरण प्रेमींमध्ये आनंदाची लहर निर्माण केली आहे. ही स्पर्धा जी एम सी बालयोगी आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर, गच्चीबाउली, हैदराबाद, तेलंगणा येथे १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पार पडली.
 

Eshwari Pandey, 
दृष्टीबाधित असलेल्या ईश्वरी पांडेने एस. ११ गटात ज्युनिअर स्पर्धेत भाग घेतला. ५० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत तिने १ मिनिट १३ सेकंदात अंतर पार करून सुवर्ण पदक पटकावले. तसेच १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये तिने २ मिनिटे २१ सेकंदात अंतर पूर्ण करून रजत पदक मिळवले. याशिवाय, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये तिने १ मिनिट २८ सेकंदात जलतरण करत आणखी एक सुवर्ण पदक जिंकले. या कामगिरीमुळे तिला तिहेरी पदक विजेती म्हणून गौरवण्यात आले.
ईश्वरी स्थानिक Eshwari Pandey,  शार्क अक्वेटिक स्पोर्टिंग असोसिएशनमध्ये नियमित सराव करते. तिचे प्रशिक्षण एन.आय.एस. जलतरण प्रशिक्षक संजय बाटवे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली केले जाते. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागपुरमधील जलतरण प्रेमी, पालक, तसेच दिव्यांग खेळाडू यांनी तिला मनःपूर्वक अभिनंदन केले.ईश्वरी पांडेच्या या यशाने पॅरा स्पोर्ट्स क्षेत्रात आणखी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून, तिच्या प्रयत्नांनी युवा खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळाले आहे.
Powered By Sangraha 9.0