नागपूर,
tribal heritage महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने, भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि जनजाती गौरव वर्षाच्या अंतर्गत राज्यस्तरीय आदिवासी संस्कृती कार्यक्रम व हस्तकला प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तसेच विदर्भातील आदिवासी समुदायांनी त्यांच्या समृद्ध वेशभूषा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सादर केल्या. कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत असून, आदिवासी संस्कृतीला व स्थानिक हस्तकलेला सन्मान देण्यास हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
सौजन्य: सुरेश चाव्हारे, संपर्क मित्र