गडचिरोली,
Gadchiroli municipal election नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षासह इतरही पक्षाने आपला उमेदावारी अर्ज दाखल करीत दावेदारी केली आहे.
जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर पालिकांमध्ये थेट नगराध्यक्षपदासह 68 नगरसेवक अशा एकून 71 जणांच्या भवितव्याच्या फैसला 2 डिसेंबर रोजी होणार आहे. तब्बल चार वर्षानंतर निवडणूका होत असल्याने उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरु होती. त्यानंतर आज प्रमुख पक्षाने आपले उमेदवार जाहीर करीत नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदासाठी अॅड. प्रणोती निंबोरकर (भांडेकर), काँग्रेसकडून कविता पोरेड्डीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडूनकडून अश्विनी नैताम यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. याशिवाय बहूजन समाज पाटी, परिवर्तन पॅनल आदी पक्षानेही आपले नामांकन दाखल केले.यावेळी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षाकडून अर्ज दाखल करतांना आपल्या कार्यकर्त्यांसह ढोल ताशांच्या गजरात रॅली काढत मोठ्याप्रमाणा शक्तीप्रदर्शन करण्यात आले.