गोंदियातून हरित ऊर्जेची क्रांती; देशभरात चर्चेत बांबू प्रकल्प

17 Nov 2025 21:06:02
अर्जुनी मोरगाव,
Gondia green energy तालुक्यातील नवेगावबांध एमटीडीसी पर्यटन संकुलात १५ नोव्हेंबर रोजी पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स, महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि आ. राजकुमार बडोले यांची शेतकर्‍यांसोबत हरित ऊर्जेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. वाढत्या ग्लोबल कार्बन उत्सर्जनाच्या संकटात बांबू लागवड ही भारताची तारणहार ठरू शकते, असा ठाम संदेश या बैठकीत देण्यात आला.

Gondia green energy
ग्लोबल कार्बन बजेट २०२५ अहवालानुसार जीवाश्म इंधनांमधून होणारे उत्सर्जन तब्बल ३८.१ अब्ज टनांवर जाणार आहे. पृथ्वीचा श्वास अधिकच गुदमरल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक, जलद पुनर्निर्मिती होणारे आणि ऊर्जा देणारे एकमेव प्रभावी पीक म्हणजे बांबू असल्याचे पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीस किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, चेतन नाकाडे, पराग कापगते, राजहंस ढोक, रामदास बोरकर, होमराज पुस्तोळे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी पाशा पटेल म्हणाले, हवामान बदल थांबवायचा असेल तर जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून हरित इंधन वाढवावे लागेल. यासाठी बांबू हा भारताचा भविष्य ऊर्जा स्त्रोत होऊ शकतो. बांबूपासून इथेनॉल, मिथेनॉल, गॅस, चारकोल, बायोडिझेल अशा अनेक हरित इंधनांचे उत्पादन करता येते. ही सर्व इंधने भूगर्भातील इंधनांना (कोळसा, पेट्रोल, डिझेल, गॅस) पर्याय ठरू शकतात. म्हणजेच जमिनीखालील संपणारे इंधनस्रोत मिटण्याआधीच भूमीवरील नवीनीकरणक्षम पर्याय बांबू ऊर्जा ‡ देशाला नवा मार्ग देऊ शकतो. गडचिरोलीत नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ग्रीन स्टील’ संकल्पना मांडली. या तंत्रज्ञानाचा पाया म्हणजे बांबू चारकोल. तज्ज्ञांच्या मते जगातील ३० टक्के हरित इंधनाची गरज बांबूपासून निर्मित चारकोलद्वारे भागवली जाऊ शकत असल्याचे ते म्हणाले.
 
 
गोंदिया जिल्हा होणार ग्रीन एनर्जी व्हॅली
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध, —अर्जुनी मोरगाव,— देवरी तालुक्यातील जंगलालगतची सुपीक जमीन बांबू लागवडीसाठी आदर्श असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शासनाकडून प्रति हेक्टर ७ लाख वित्तीय सहाय्य, लागवड तंत्रज्ञान, उद्योगांशी करार आणि मार्केट उपलब्धता ‡ या सर्व गोष्टींमुळे गोंदिया जिल्ह्यात हरित अर्थव्यवस्थेचा नवा युग सुरू होऊ शकतो. आज घेतलेला निर्णय पुढील ४० वर्षांचे भविष्य बदलणार आहे. बांबू लागवड ही ग्रामीण संपन्नतेची सर्वात मोठी किल्ली ठरू शकते.
बांबू क्रांती का महत्त्वाची?
१ हेक्टरमधील बांबू ५० टन कार्बन शोषतो, २००० उद्योग —उत्पादने निर्मिती, इथेनॉल-—मिथेनॉल-—चारकोल हे भूगर्भातील इंधनांना सर्वात प्रभावी हरित पर्याय, ४० वर्षे सतत उत्पादनपाण्याची कमी मागणी, —देखरेख कमी, हवामान बदलावर सर्वात जलद परिणाम करणारे पीक असल्याने बांबू क्रांती महत्वाची ठरते.
Powered By Sangraha 9.0