उमेदवार ठरले...शक्तीप्रदर्शनातून नामांकन दाखल

17 Nov 2025 21:02:53
गोंदिया,
Gondia municipal elections जिल्ह्यात होऊ घातलेल्या गोंदिया, तिरोडा नगर परिषद व गोरेगाव, सालेकसा नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी एकाही राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहिर झाले नसताना सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांकडून उमेदवारांचे नाव उघड करण्यात आले. सोमवारी चारही तालुका मु‘यालयात सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून नामांकन अर्ज दाखल केले. त्यात अपक्ष उमेदवारांनीही आपल्या समर्थकांसह अर्ज दाखल करून लक्ष वेधले. नगराध्यक्षपदाच्या ४ जागांसाठी ४४ तर ९८ नगरसेवक पदासाठी ७०० उमेदवारांनी नामांकन दाखल केले.
 

Gondia municipal elections 
जिल्ह्यातील गोंदिया नगर परिषदेच्या ४४ नगरसेवक, तिरोडा नपच्या २०, गोरेगाव व सालेकसा नगरपंचायतच्या प्रत्येकी १७ जागांसाठी तसेच चारही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येकी नगराध्यक्षपदासाठी १० नोव्हेंबरपासून नामांकनपत्र दाखल करण्यास सुरूवात झाली. परंतु सुरूवातीच्या तीन दिवसात बोटावर मोजण्याऐवढी सं‘या होती. त्यातच प्रमुख राजकीय पक्षांना नगराध्यक्षपदासह नगरसेवक उमेदवारी ठरविताना तारेवरची कसरत करावी लागली. परिणामी १६ नोव्हेंबरपर्यंत राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झाली नव्हती. अशात राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या इच्छूकांनीही नामांकन पत्र दाखल केले नव्हते. परिणामी १६ नोव्हेंबर रोजीपर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या १०२ जागांसाठी गोंदियात २६९, तिरोडा ६७, गोरेगाव ६५ व सालेकसात ४३ नामांकन दाखल झाले होते. दरम्यान, सोमवार १७ नोव्हेंबर नामांकन दाखल करण्याची शेवटी तारीख असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे नामांकन शक्तीप्रदर्शन करीत सादर केले. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी चारही स्थानिक स्वराज्य संस्थेत दाखल केलेल्या नामांकनाची सं‘या दुप्पट झाल्याचे दिसून आले. आज, शेवटच्या दिवशीपर्यंत ४ नगराध्यक्ष पदासाठी ४४ उमेदवारांनी तर ९८ नगरसेवक पदासाठी ७०० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यात गोंदिया नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजपने कशिश जायस्वाल, राष्ट्रवादी काँग‘ेस (अजित पवार) प्रा. माधुरी नासरे, काँग‘ेस सचिन शेंडे, शिवसेना (शिंदे गट) डॉ. प्रशांत कटरे व आम आदमी पक्षाने उमेश दमाहे यांचे तसेच नगरसेवक उमेदवारांचे नामांकन दाखल केले. तिरोडा येथे भाजपकडून अशोक असाटी, राष्ट्रवादी काँग‘ेस अजयसिंह गौर, काँग‘ेस गजेंद्र सिंगनजुडे, राकॉ (शरद पवार) संदिप पाटील, अपक्ष राजेश तरारे, दिलीप लिल्हारे यांनी नामांकन दाखल केले. गोरेगावात भाजपतर्फे अजय कोठेवार, राष्ट्रवादी काँग‘ेस संजय घासले, काँग‘ेस तेजराम (छोटू) बिसेन तर अपक्ष निलेश राऊत, सुधाकर लटये, स्नेहील कोठेवार, मुकेश कुसराम, शालीकराम यांनी नामांकन दाखल केले. त्यातच सालेकसा येथे भाजपकडून राजेंद्र बडोले, राकाँ (अजित पवार) ब‘जभुषण बैस, काँग‘ेसने विजय फुंडे, शिवसेना (उठाबा) वंदना क्षीरसागर, राकॉ (शरद पवार) मनोज डोये, शिवसेना (शिंदे) मनीष असाटी यांनी नामांकन दाखल केले.
नप व नपंसाठी दाखल अंतिम नामांकन
 
शहर नगराध्यक्ष नगरसेवक
गोंदिया १६ ४०७
तिरोडा ६ ११८
गोरेगाव ८ ८४
सालेकसा १४ ९१
एकूण ४४ ७००
Powered By Sangraha 9.0