खासदार महोत्सवात दिव्यांगांचा भावपूर्ण सहभाग

17 Nov 2025 14:47:20
नागपूर,
Khasadar mahotsav 2025 नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सवात 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या गीतापठण समारंभात संज्ञा चैतन्य संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण व मनोभावे सहभाग नोंदवला. प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य श्री गोविंद गिरी महाराज उपस्थित होते.
 
Khasadar mahotsav 2025
  
भव्य मंचावर इतर विद्यार्थ्यांसह गीता पठण करण्याच्या संधीमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला. पाठांतर आणि उच्चारणासाठी संस्थेचे अध्यक्ष शेखर दामले, संध्या भालेराव व शिक्षिका श्रुती अत्रे यांनी विशेष मार्गदर्शन केले. प्रौढ मतिमंदांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या संज्ञा चैतन्य संस्थेने या संधीसाठी मा. नितीन गडकरी आणि महोत्सव समितीचे आभार मानले. Khasadar mahotsav 2025 या उपक्रमातून समाजात सेवाभाव, आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होत असल्याचा संस्थेचा विश्वास आहे.
सौजन्य: गौरी बेलन, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0