गडचिरोली,
pranoti-nimborkar गडचिरोली नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठी उत्सुकता होती. ही उत्सुकता संपवत आज भाजपाने आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रणोती निंबोरकर यांचे नाव जाहीर केले असून, त्यांनी आजच सकाळी नगरपरिषदेच्या निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उपस्थित होती.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडे प्रणोती निंबोरकर, रीना चीचघरे, योगिता पिपरे आणि गीता हिंगे या चार महिलांनी इच्छुक उमेदवारी दाखल केली होती. पक्षात अंतर्गत स्तरावर अनेक चर्चा, तपासणी व छाननी केल्यानंतर आज गडचिरोलीचे प्रभारी आमदार कीर्ती कुमार बांगडिया यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली. घोषणा करताना आमदार बांगडिया म्हणाले, “प्रणोती निंबोरकर या युवा, सुशिक्षित आणि सक्षम नेतृत्वाचे प्रतीक आहेत. pranoti-nimborkar नगरपरिषदेसमोरील प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा, कौशल्य आणि प्रशासनिक समज त्यांच्यात असून गडचिरोलीच्या विकासासाठी त्या सार्थक बदल घडवतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून अनेक नावे समोर येत असली तरी पक्षाने गटबाजी टाळत सर्वसमावेशक पद्धतीने निर्णय घेतला. प्रणोती निंबोरकर यांच्या नावाला पक्षातील सर्व नेते व कार्यकर्त्यांचा सकारात्मक पाठिंबा मिळाला आहे, त्यामुळेच भाजपचा विजय निश्चित आहे.” उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गडचिरोलीत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. pranoti-nimborkar शहरात त्यांच्या अभिनंदनपर बॅनर्स, पोस्टर्स आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. निंबोरकर यांनीही अर्ज भरताना पक्षाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्थानिक समस्यांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, उद्यानांचा विकास, महिला सुरक्षा, डिजिटल प्रशासन यांसारख्या मुद्द्यांवर त्या विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे. pranoti-nimborkar राजकीय जाणकारांच्या मते, भाजपाने युवा नेतृत्वाला संधी देत आगामी निवडणुकीत एक प्रभावी संदेश दिला आहे. गडचिरोलीतील बदलत्या राजकीय वातावरणावर ही निवड परिणामकारक ठरणार असून, विरोधी पक्षाकडून कोणती रणनीती आखली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.