मुंबई,
Pati Patni Aur Panga season 1 ‘बिग बॉस 14’नंतर पुन्हा एकदा रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्लाने विजयाची कमान फडकावली आहे. या लोकप्रिय दाम्पत्याने ‘पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनचे विजेतेपद आपल्या नावे केले असून ग्रँड फिनालेत सोनाली बेंद्रेनं त्यांच्या नावाची घोषणा केली. सध्या सोशल मीडियावर या दोघांचा ट्रॉफीसह फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
या शोच्या अंतिम फेरीत दोन दमदार जोडप्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. एका बाजूला रुबिना आणि अभिनव तर दुसऱ्या बाजूला गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी होते. तगड्या स्पर्धेनंतर अखेरीस रुबिना–अभिनव या जोडीनं ट्रॉफी आपल्या खांद्यावर घेतली.
‘पती पत्नी और पंगा’चा पहिला सिझन ऑगस्ट 2025 मध्ये सुरु झाला होता. जवळपास तीन महिने चाललेल्या या शोचा ग्रँड फिनाले 16 नोव्हेंबर रोजी पार पडला. आता प्रेक्षकांसाठी ‘लाफ्टर शेफ्स’चा तिसरा सिझन 22 नोव्हेंबरपासून ओटीटी आणि टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या सिझनमध्ये हिना खान, स्वरा भास्कर, गीता फोगाट, सुदेश लहरी, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, अविका गौर आणि देबिना बॅनर्जी यांनी त्यांच्या जोडीदारांसह सहभाग घेतला होता.
या शोची खास ‘लाडू’ , Pati Patni Aur Panga season 1 डिझाइनची ट्रॉफीही प्रेक्षकांच्या उत्सुकतेचे केंद्र ठरली. ट्रॉफी जिंकल्यानंतर रुबिना आणि अभिनवने भावूक शब्दांत आनंद व्यक्त केला. “या शोमुळे आम्हाला एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळाली. रोजच्या धावपळीत हा वेळ अमूल्य होता. एक जोडी म्हणून आम्ही परिपूर्ण नाही, पण एक जोडपं म्हणून आज आम्ही ठामपणे एकत्र आहोत,” असे त्यांनी सांगितले.रुबिना आणि अभिनव काही वर्षांपूर्वी ‘बिग बॉस 14’मध्ये सहभागी झाले होते. त्या काळात त्यांच्या नात्यातील ताणतणाव विशेष चर्चेत होता आणि शो संपल्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चेलाही उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर दोघांनी आपापसातील मतभेद दूर करत नात्याला नवी संधी दिली. आज ते त्यांच्या जुळ्या मुलींसह आनंदी आयुष्य जगत आहेत.विजयानंतर दोघांनी चाहत्यांचे मनापासून आभार मानत सांगितले, “चांगला दिवस असो वा वाईट, प्रत्येक वेळी एकमेकांची निवड करणं हेच आमच्यासाठी प्रेमाचं खरं रूप आहे.”