तरूणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला 20 वर्षांची शिक्षा

17 Nov 2025 13:33:02
नागपूर,
Sexual assault on a young woman एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोघांनी लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती तरुणी गर्भवती झाली. या प्रकरणी दोन्ही युवकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या खटल्यात न्यायालयाने एका तरुणाला 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा तर दुस-या तरुणाला निर्दोष मुक्त केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी हा निर्णय दिला. राहुल चंदूजी आहुजा (30, रा. कळमणा मार्केट ), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अमोल महादेव गोंडाणे (24, रा. समता नगर ) असे दोषमुक्त झालेल्या आरोपीचे नाव आहे.

Sexual assault
 
 
 
15 नोव्हेंबर 2020 ते 20 मे 2021 यादरम्यान कपिलनगर हद्दीत राहणाèया 41 वर्षीय महिलेच्या 15 वर्षीय आरोपी राहूल आहुजाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला आपल्या घरी वारंवार बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती झाली. तसेच आरोपी अमोल गोंडाणे याने पीडित मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावून धमकी दऊून चाकूचा धाक दाखवून तिच्याशी एकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा अमोलवर आरोप केला होता. मुलगी गर्भवती झाल्याचे लक्षात येताच तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना 26 जून 2021 रोजी अटक केली होती. तत्कालीन सहाय्यक उपायुक्त रोशन पंडित यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिध्द झाल्याने न्यायाधीश शेख यांनी आरोपीला कलम 4 व 6 पोक्सो अ‍ॅक्ट तसेच कलम 376 (ब) 376 2 जे) , 376 2 एन) भादंवि अन्वये 20 वर्षे सश्रम कारावास, व 10 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा ठोठावली. सहाय्यकौजदार प्रकाश बारंगे, राजेश शिंगणे यांनी न्यायालयाला सहकार्य केले. आरोपी अमोलर्ते अ‍ॅड. अमित बंड, सरकारर्ते अ‍ॅड. प्रशांत साखरे यांनी बाजू मांडली.
Powered By Sangraha 9.0