...शेख हसिनांना ६० दिवसांत दिली जाईल फाशी? आता फक्त हा कायदा वाचवू शकतो

17 Nov 2025 16:10:16
ढाका, 
sheikh-hasina बांग्लादेशच्या राजकारणात मोठा भूचाल उमटला आहे. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (आयसीटी) माजी पंतप्रधान शेख हसीनाला तीन गंभीर प्रकरणांमध्ये दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधिकरणाने २०२४ मध्ये झालेल्या देशव्यापी निदर्शनांमध्ये १,४०० लोकांच्या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार मानले आणि “मानवतेविरुद्ध गुन्हे” केलेला ठरवले.
 
 
sheikh-hasina
 
शेख हसीना गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ भारतात निर्वासित आहेत. ५ ऑगस्ट २०२४ रोजी बांग्लादेशतील मोठ्या विद्यार्थ्यांच्या उठावानंतर आणि हिंसाचारानंतर त्यांना दिल्लीमध्ये आश्रय घ्यावा लागला. तिथून त्यांनी बांगलादेशच्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, या शिक्षेनंतर त्यांच्याकडे कोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत आणि ते स्वतःच्या शिक्षेला आव्हान देऊ शकतात का. sheikh-hasina आयसीटी कायदा १९७३ च्या कलम २१ नुसार दोषींना निर्णय झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत अपील करण्याचा अधिकार आहे. शेख हसीनाला ही अपील बांगलादेश सुप्रीम कोर्टच्या अपीलीय विभागात करावी लागेल. भारतात असल्यामुळे त्यांचे वकील अपील दाखल करू शकतात, पण न्यायालय त्यांची वैयक्तिक उपस्थिती मागू शकते, ज्यामुळे मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
 
जर शेख हसीनांनी ६० दिवसांच्या आत अपील केली नाही, तर आयसीटी कडून दिलेला मृत्युदंड अंतिम मानला जाईल आणि त्याची अंमलबजावणी होईल. मात्र अपील यशस्वी झाली तर पुनः सुनावणी होऊ शकते किंवा शिक्षा कमी केली जाऊ शकते. थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात आयसीटीचा निर्णय आव्हान करता येत नाही. मात्र शेख हसीना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समिती किंवा इतर आंतरराष्ट्रीय मंचावर “निष्पक्ष सुनावणी न झाल्याची” तक्रार करू शकतात. sheikh-hasina या तक्रारी शिक्षेला रद्द करत नाहीत, फक्त दबाव निर्माण करतात. आयसीटी न्यायालय हा बांग्लादेशमधील सर्वात शक्तिशाली न्यायसंस्था मानली जाते. संसदेने तयार केलेल्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या या न्यायालयाचे निर्णय त्वरित प्रभावी होतात आणि प्रशासन व पोलीसांना त्वरित कारवाई करावी लागते. न्यायाधिकरणाला कोणत्याही व्यक्तीविरुद्ध – मंत्री असो, संसद सदस्य असो किंवा माजी पंतप्रधान असो – अटक वॉरंट जारी करण्याचे, खटला चालविण्याचे आणि शिक्षा सुनावण्याचे अधिकार आहेत.
 
शेख हसीना भारतात असल्यामुळे त्यांची अटक व प्रत्यर्पण बांग्लादेशसाठी कठीण आहे. सर्वोच्च न्यायालय त्यांच्या अनुपस्थितीत अपील सुनावणीस मंजुरी देतो की नाही, हे त्यांच्या भविष्याचे ठराविक ठरेल.  sheikh-hasinaबांगलादेश २०२४ पासून भारतावर प्रत्यर्पणाचा दबाव टाकत आहे. तथापि, २०१३ च्या प्रत्यर्पण करारानुसार, भारत राजकीय कारणांमुळे आरोपी व्यक्तीला सोपवण्यास नकार देऊ शकतो. भारत “सुरक्षेच्या कारणास्तव” हसीनाला संरक्षण देत आहे आणि त्यांच्या प्रत्यर्पणाचा निर्णय दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम करू शकतो. प्रत्यार्पण कायदा म्हणजे दुसऱ्या देशाच्या विनंतीनुसार आरोपी व्यक्तीला त्या देशास सुपूर्द करण्याची व्यवस्था. भारतात ही प्रक्रिया १९६२ च्या प्रत्यर्पण कायद्यांतर्गत चालवली जाते. या कायद्यानुसार भारत फक्त देशातील आरोपींना परदेशात पाठवू शकत नाही, तर परदेशातील गुन्हेगारांना भारतात आणू शकतो. ही प्रक्रिया सहसा दोन्ही देशांमधील प्रत्यर्पण करारावर आधारित असते, परंतु करार नसतानाही देशांतर्गत कायद्यांच्या आधारे प्रत्यर्पण केले जाऊ शकते.
Powered By Sangraha 9.0