सिंदी रेल्वेत शेवटच्या दिवशी २१६ नामांकन दाखल

17 Nov 2025 21:40:57
सिंदी
Sindi Railway municipal elections नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार १७ रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. २१६ उमेदवारांनी अर्ज सादर केले असून अनेक मातब्बरांनी अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केले आहेत. त्यांची संख्या अर्धा शतकाच्यावर म्हणणे ५२ आहे.निवडणूक निर्णय अधिकारी बबिता आळंदे आणि सहाय्यक प्रणोती गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त अर्जांची छानणी सुरू आहे आणि कधी संपेल सांगता येत नाही. यावर्षी नगराध्यक्षपदासाठी आठ महिलांनी अर्ज भरले. त्यात भाजपाकडून तेजस्विनी स्नेहल कलोडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे माजी नगराध्यक्ष सुनीता कलोडे, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून नंदिनी भुते, काँग्रेसकडून वनिता डफ, उबाठाकडून चेतना शिंदे आदींनी नामांकनपत्र ए. बी. फॉर्मसोबत सादर केले. त्याशिवाय अपक्ष तीन जणांचे अर्ज देखील प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे.
 

Sindi Railway municipal elections 
दहा प्रभागातून निवडणूक लढविणार्‍यांत १०८ उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रीय पक्षांचे ९४ उमेदवार आहे. शिवाय डझनभर अपक्षांनी आपले नामांकनपत्र दुपारी ३ वाजेपर्यंत सादर केले. प्राप्त अर्जांची छानणी सायंकाळी ५ नंतर सुरु झाली. उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी २५ नोव्हेंबरला दुपारी २ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक लढण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी रात्री उशिरा जाहीर होण्याची शयता आहे.
Powered By Sangraha 9.0