संस्कार भारतीची स्मरणिका या परिवारांना प्रदान

17 Nov 2025 13:30:27
नागपूर,
Sanskar Bharati संस्कार भारतीने संघ शताब्दी वर्षानिमित्त संघव्रतींच्या पुण्यस्मरणार्थ साकारलेल्या १०१ पोर्ट्रेट रांगोळी प्रदर्शनी ‘संघ दधीची’ स्मरणिका नुकतीच केळकर, चाटी आणि मेढे कुटुंबीयांना भेट म्हणून प्रदान करण्यात आली. या स्मरणिकेत वंदनीय केळकर, उषा चाटी आणि प्रमिला मेढे यांच्या पोर्ट्रेट रांगोळीचा समावेश होता.
 
Sanskar Bharati
 
वंदनीय केळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अहिल्या मंदिरात झालेल्या एका अनौपचारिक, कौटुंबिक आणि भावपूर्ण कार्यक्रमात ही स्मरणिका देण्यात आली. Sanskar Bharati कार्यक्रमाला माधव केळकर, रमा केळकर, धनंजय चाटी, उज्वला चाटी, उदय चाटी, पद्मा चाटी, संजय मुळे, अश्विनी मुळे आणि भरत महाशब्दे उपस्थित होते.
 
राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्रा जोशी आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री आशुतोष अडोणी यांच्या हस्ते ही स्मरणिका प्रदान करण्यात आली. Sanskar Bharati यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या करुणा साठे, पूनम गुप्ता, प्रज्ञा मनोहर, मनिषा संत तसेच संघ दधीची उपक्रमाचे सहसंयोजक प्रसाद पोफळी उपस्थित होते.
सौजन्य: अंजली मुली, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0