विजय माल्ल्याचा दावा! किंगफिशरमुळे मिळाली प्रसिद्धी

17 Nov 2025 14:02:35
मुंबई,
Vijay Mallya 2000 च्या दशकात भारतीय फॅशन आणि ग्लॅमर जगतात किंगफिशर कॅलेंडर हा एक भव्य आणि चर्चेचा प्रकल्प मानला जात होता. उद्योगपती विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्स समूहाने हा कॅलेंडर लॉन्च केला आणि काही वर्षांतच तो बॉलिवूडमध्ये करिअरची संधी देणारा प्रमुख प्लॅटफॉर्म बनला. या कॅलेंडरमुळे दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्री रातोरात चर्चेत आल्याचे मानले जाते.
 

Vijay Mallya 
अलीकडील एका मुलाखतीत विजय मल्ल्याने या कॅलेंडरबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. “आम्ही योग्य चेहरे आणि योग्य मुलींची निवड केली. किंगफिशर कॅलेंडरमुळे दीपिका पादुकोणपासून कतरिना कैफपर्यंत अनेक मॉडेल्सना मोठी ओळख मिळाली. आमच्या कॅलेंडरला फार वर्ष होत नव्हती, पण त्यावेळी सर्वच सेलिब्रिटी त्यात झळकण्याची इच्छा बाळगत होते,” असे मल्ल्याने सांगितले. कॅलेंडर हे एक प्रभावी मार्केटिंग टूल असल्याचे त्याने नमूद केले आणि त्यातून स्वतःला कोणताही वैयक्तिक फायदा झाला नसल्याचाही दावा केला.
किंगफिशर कॅलेंडरच्या विविध आवृत्त्यांमध्ये कतरिना कैफ, याना गुप्ता, दीपिका पादुकोण, ब्रुना अब्दुल्ला, नरगिस फाखरी, ईशा गुप्ता, लिझा हेडन आणि सयामी खेर यांसारख्या अनेक प्रसिद्ध मॉडेल्स आणि अभिनेत्री झळकल्या. 2003 च्या लॉन्च एडिशनमध्ये कतरिना कैफचा सहभाग होता, तर 2006 मध्ये दीपिका पादुकोण कॅलेंडरचा भाग बनली.
मुलाखतीदरम्यान Vijay Mallya  त्याला अभिनेत्रींसोबतच्या खासगी संबंधांबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. यावर मल्ल्याने ते संबंध फक्त कॅलेंडर प्रकल्पापुरते मर्यादित असल्याचे सांगितले.किंगफिशर ब्रँड तेजीत असताना त्याचा प्रभाव बॉलिवूड आणि फॅशन जगतात मोठ्या प्रमाणात जाणवत होता. अनेक मॉडेल्ससाठी कॅलेंडर हे चित्रपटसृष्टीकडे जाणारे दार ठरले. आज दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ या दोघीही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी आहेत. दमदार अभिनय, विविध भूमिका आणि सतत सक्रिय असणारे सोशल मीडिया यामुळे दोघींनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.कधी काळी ग्लॅमर इंडस्ट्रीत वेगळा ठसा उमटवणारा किंगफिशर कॅलेंडर आता इतिहासाचा भाग असला, तरी त्यातून पुढे आलेली अनेक नावं आजही बॉलिवूडमध्ये चमकत आहेत.
Powered By Sangraha 9.0