अमरावती,
join bjp काँग्रेसच्या पदाधिकार्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केला. भाजपा अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली व खा. डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा तसेच भाजपा प्रदेश प्रवक्ते किरण पातुरकर, महामंत्री बादल कुळकर्णी, ललित समदूरकर, राधा कुरील, मनपा पक्षनेता सुनी काळे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्की शर्मा, सुनील साहू आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोरबाग मसानगंज प्रभागाचे काँग्रेस पदाधिकारी दीपक साहू तसेच काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे अतिशय निकटवर्तीय आकाश तायडे, कल्याणी तायडे या सर्वांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
मोरबागमधील दीपक साहू यांच्यासह पक्ष प्रवेश करणार्यांमध्ये जतीन यादव, दीपक साहू, निकेश खुरखुरिया, राज गुप्ता, संदीप बागडी, सचिन साहू, विशाल गुप्ता, निखिल गुप्ता, विशाल ककांनीवाले, आकाश बसेरिया, रोहित मंटोले, बिहारी साहू, मनीष साहू, सुमित मंटोले, विकी जगमलानी, भूषण कुशवाह, सचिन गुप्ता, रोहित गुप्ता, कवी ठाकूर, मुकेश साहू, गोलू बिजोरे, राम अहिरवार, क्रिश संकट, साहिल श्रीवास, अनुप चिप्सवाले, लोकेश साहू, बंटी ठाकूर, संतोष विश्वकर्मा, भूपेंद्रसिंग ठाकूर, शुभम गुप्ता, अंश गुप्ता, आनंद साहू आदींचा समावेश आहे.join bjp तसेच आकाश तायडे यांच्यासह शेगाव रहाटगाव भागातील कल्याणी आकाश तायडे, दीक्षा मोहोळ, सोनाली वर्धेकर, मयुरी भारती, लता काकडे, रूपाली काकडे, अश्विनी काकडे, सोनाली दखणे, राधिका मानेकर, किरण सराडकर, अपर्णा इंगळे, अमित बोरखडे, सिद्धांत वाकडे, अभी सांगळूदकर, यश आरमाळे, अनिरुद्ध सटके, वैभव वाडकर, भावेश क्षीरसागर, दुर्गेश चौधरी, सचिन राठोड, अभी जावळे, निखिल येवले, इत्यादींनी जाहीर प्रवेश केला.