भंडारा,
bhandara-weather मागील काही दिवसांपासून वातावरणातील गारठा वाढून थंडी जाणवू लागली असतानाच आज 18 रोजी या मोसमातील आतापर्यंतच्या सर्वात कमी म्हणजे 9.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे भंडारा गारठला आहे.
आज प्रचंड बोचरी थंडी भंडारेकरांनी अनुभवली. सकाळी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसते. थंडीचा परिणाम नियमित सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांवरही जाणवला. ही संख्या रोडवली होती. 10 अंशाच्या खाली पारा घसरल्याने आता पुढे किती गारठा वाढेल ही चिंता नक्कीच भंडारेकरांना भेडसावताना दिसेल. bhandara-weather दरम्यान थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नामदास यांनी केले आहे.