काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष भाजपात

18 Nov 2025 12:35:42
नांदगाव खंडेश्वर,
congress mayor joins bjp नगर पंचायत निवडणुकीत सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड उलथापालथ झाली असून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे दिसून आले, त्याचप्रमाणे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
 
 

congress mayor 
 
 
या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेससह माकपने कुणाशीही युती न करता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह १७ ही नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. तर शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची युती झाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाल्याचे सांगण्यात आले. या पक्षांनी सुद्धा नगराध्यक्ष पदासह सर्व १७ नगरसेवक पदांसाठी उमेदवारी दाखल केली. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि युवा स्वाभिमान पक्ष यांनी फक्त नगरसेवक पदांसाठी काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शेवटच्या दिवशी एकूण ९८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ११ जणांनी आणि नगरसेवक पदासाठी ८७ जणांनी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी जाधव, नगर पंचायतीचे प्रशासक निवृत्ती भालकर, आणि सर्व कर्मचारी तसेच ठाणेदार श्रीराम लांबाडे व पोलिस कर्मचारी यांनी व्यवस्था सांभाळली.congress mayor joins bjp एकूणच अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस हा प्रचंड उलथापालथीचा ठरला. भाजपाच्या स्वाती राजेश पाठक, काँग्रेसच्या वीणा निशांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कल्पना अमोल मारोटकर, शिवसेना उबाठाच्या प्रीती विलास मारोटकर, तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आयशा परवीन यांचेसह सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली.
Powered By Sangraha 9.0