व्यवस्थापनातील बदल विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार

18 Nov 2025 11:39:29
नागपूर,
webinar-on-change-management ’आपत्कालीन व्यवस्थापनातील बदल’ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन व स्थानिक स्वराज्य शासन विभागात पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोक व स्थानिक स्वराज्य विभाग आणि पिअर्स कॉलेज वॉशिंग्टन अमेरिका यांच्या शैक्षणिक सहकार्याने या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
 
 
webinar-on-change-management
 
कार्यक्रमाची सुरुवात लोक प्रशासन व स्थानिक स्वराज्य शासन विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुप्रिया डेव्हिड यांच्या स्वागतपर आणि प्रास्ताविकेने झाली. जागतिक पातळीवरील आव्हानांना शाश्वत उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याचे वाढते महत्त्व त्यांनी केले. या वेबिनारच्या यशस्वी आयोजनात मोलाचा वाटा उचलणार्‍या सर्व सहकार्‍यांचे त्यांनी आभार मानले. विभागातील संशोधक विद्यार्थिनी मेघना मंडल यांनी सत्रासाठी डॉ. सुप्रिया डेव्हिड आणि पिअर्स कॉलेज, वॉशिंग्टन, अमेरिका येथील सहयोगी प्राध्यापक लेनोरा जी. बोरचार्ट या मान्यवर वक्त्यांची करून दिली. webinar-on-change-management डॉ. सुप्रिया डेव्हिड यांनी भारतातील आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील वाढती नेतृत्व संस्थात्मक व कायदेशीर चौकट, विशेष प्रतिसाद दल आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीबाबत सविस्तर विवेचन केले. भोपाळ वायू दुर्घटना, चेन्नई व केरळातील पूर यांच्या उदाहरणांद्वारे त्यांनी भारतातील आपत्ती व्यवस्थापनासाठी आर्थिक तयारी आणि धोरण सुधारणा यांची गरज स्पष्ट केली. तसेच, न्यूझीलंड, अमेरिका, फ्रान्स, स्वीडन आणि नेदरलँड्स मधील यशस्वी अनुभवांचा देत सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या प्रभावी त्यांनी लक्ष वेधले.
Powered By Sangraha 9.0