शासनाची फसवणूक करणार्‍यांची चौकशी

18 Nov 2025 12:03:22
वर्धा,
wardha news कामगार मंडळात कामगारांची नोंदणी करण्यासाठी बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर करणे तसेच शासकीय कागदपत्रांची छेडछाड केल्याबद्दल मोहन ब्राह्मणकर व जिल्ह्यातील अन्य दलाल, एजंट, बोगस कंत्रादरांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून रामनगर पोलिसांच्या वतीने याप्रकरणी चौकशी केली जात आहे.
 
 

investigation 
 
 
बोरगाव मेघे येथील मोहन ब्राह्मणकर यांची नोंदणी अप्पर कामगार आयुत या नावाने निर्गमित केल्याचे दिसून येते. नोंदणीप्रमाणे पडताळणी केली असता सदर नोंदणी प्रमाणपत्र कामगार विभागाच्या नागपूर कार्यालयाकडून निर्गमित केले नसल्याचे आढळून आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्याकरीता अर्ज केलेल्या प्रभागाविरुद्ध कंत्राटदाराचे बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर करून मंडळाची दिशाभूल केली.wardha news त्यांनी शासकीय कागदपत्रांची छेडछाड केली आहे. त्यामुळे ब्राह्मणकर तसेच कामगारांची व शासनाची दिशाभूल करणार्‍या जिल्ह्यातील दलाल, एजंट, बोगस कंत्राटदारांविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षकामार्फत तसेच पोलिस अधीक्षकांमार्फत देखील चौकशीबाबत कारवाई सुरू आहे, असे सरकारी कामगार कार्यालयाचे नोंदणी अधिकारी रिना पोराटे यांनी कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0