हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचा प्रारंभ

18 Nov 2025 12:21:43
अमरावती, 
rajya natya sprdha महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी अमरावती येथील पीडीएमसी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे १४ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून रविवार, १६ नोव्हेंबर रोजी आझाद हिंद मंडळाचे ‘एकेक पान गळावया’ हे नाटक सादर झाले. अतिशय सुसज्ज नाट्यगृहात स्पर्धेचे नाटक सादर करता येणार असल्यामुळे स्पर्धकांमध्ये अतिशय उत्सुकता असून आनंद सुद्धा व्यक्त केल्या जात आहे. रसिक प्रेक्षकांना देखील या नाट्यगृहात अतिशय सुंदर वातावरणात नाट्यानुभव घेता येत आहे.
 
 

dgsgsg 
 
 
किन्नर गुरु सोनाबाई मोहनाबाई यांचे हस्ते, नाट्य परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर डोरले यांचे अध्यक्षतेखाली आणि नाट्य परिषद नियामक मंडळ, मुंबईचे प्रशांत देशपांडे तसेच अमरावती विद्यापीठ प्रदर्शिक कला विभाग प्रमुख प्रा. भोजराज चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उदघाटन झाल्यानंतर सर्व स्पर्धक संस्थाना नाट्य परिषद अध्यक्ष आणि कार्यवाह मिलिंद जोशी यांच्याकडून शुभेच्छा व स्मृतिचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन राजेंद्र पांडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल प्रांजळे यांनी केले. कार्यक्रमानंतर लगेच विनोद सुरोसे लिखित ‘माणुसकी’ हे नाटक सादर झाले. सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी सांगितले.rajya natya sprdha आझाद हिंद मंडळ निर्मित ‘एकेक पान गळावया’ या डॉ. समीर मोने लिखित आणि अजित वडवेकर दिग्दर्शित नाटकात आशुतोष देशपांडे, अजित वडवेकर, जयंत देशपांडे, अमृता वडवेकर, गौरी धारव, मकरंद ढोके, पूजा देशमुख, सुधीर जोशी, अथर्व देशमुख, निखिल इंगोले आणि प्रिया देशपांडे यांच्या भूमिका होत्या. नेपथ्य विशाल ताराळ , प्रकाश योजना स्वेहा तराळ, पार्श्वसंगीत स्वाती तराळ, रंगभूषा विराग जाखड, रंगमंच व्यवस्था रसिका वडवेकर व रंगमंच सहाय्य राजेंद्र पाचघरे यांनी सांभाळले.
Powered By Sangraha 9.0