नागपूर,
saint-dnyaneshwar-maharaj हावरापेठ मार्ग क्रमांक ६ येथे स्वर्गीय मजुंळाबाई गोडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील २६ वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.उत्सवाची सुरुवात घटस्थापना व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन रविंद्र गोडे व वंदना गोडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक रमेश मेहर, काकड आरती प्रमुख तुळशीराम गायकवाड, ॲड. रमेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

दररोज दुपारी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन वंदना गोडे यांनी केले,saint-dnyaneshwar-maharaj तर साई महिला भजन मंडळाने भावपूर्ण भजनांचा कार्यक्रम सादर केला.शेवटच्या दिवशी काकड आरतीनंतर भव्य रामधुन दिंडी काढण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक व बालगोपाल सहभागी झालेल्या या दिंडीचे सडा-रांगोळीने सजवलेल्या परिसरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पारंपरिक दहिहंडी फोडून उत्सवाला उत्साहाचे परिपूर्ण स्वरूप प्राप्त झाले.समारोप महाआरती, गोपाळकाला प्रसाद व महाप्रसाद वितरणाने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरेश्वर गोडे, मंगला भोयर, कौतुभ गोडे, बाळकृष्ण हातागडे, नयन गोडे, यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य : रमेश मेहर,संपर्क मित्र