स्वदेशी संकल्प रथयात्रेचे पूर्व नागपूरात स्वागत

18 Nov 2025 11:22:40
नागपूर,
swadeshi-sankalp-rath-yatra पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकलच्या आवाहनानंतर स्वदेशी मागणीत वाढ झाली आहे. स्वदेशीचा स्वीकार केल्यास आपल्या रुपयाचे मूल्य मजबूत होईल आणि अनेक आवश्यक आयात वस्तू स्वस्त होतील. तसेच स्वयंरोजगार आणि लघु उद्योजकांच्या वाढीला चालना मिळेल, असा ठाम विश्वास ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बालकृष्ण भारतीय यांनी व्यक्त केला.
 

swadeshi-sankalp-rath-yatra 
 
स्वदेशी संकल्प रथयात्रेच्या माध्यमातून स्वदेशीचा प्रचार प्रसार केल्या आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आणि स्वदेशी जागरण मंचच्या वतीने स्वदेशी संकल्प रथयात्रेच्या तिसर्‍या दिवशी पूर्व व मध्य नागपूरातील घाऊक बाजारपेठेत ठिकठिकाणी व्यापार्‍यांनी स्वागत केले. swadeshi-sankalp-rath-yatra  नागपूर किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने प्रमोद सदानी, नीलेश सुचक, मयूर पंचमतिया आदींनी स्वागत केले. याशिवाय स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशनने भारत माता चौकात स्वागत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष फारुख अकबानी, हेमंत सारडा, सचिन पुनियानी यांनी मार्गदर्शन केले.
Powered By Sangraha 9.0