नागपूर,
Agrasen Bhavan भारत विकास परिषद (BVP) पश्चिम क्षेत्रीय ‘भारत को जानो२०२५’ प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन विदर्भ प्रांतातर्फे अग्रसेन भवन, रविनगर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रीती बिल्डर्सचे संचालक पराग प्रधान यांनी केले. यावेळी राष्ट्रीय समन्वयक चंद्रशेखर घुशे, पश्चिम क्षेत्र सरचिटणीस विनोद लाठिया, विदर्भ प्रांत अध्यक्ष पद्माकर धानोरकर, समन्वयक कविता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
पश्चिम क्षेत्रातील गुजरात, महाराष्ट्र, गोवा यांसह एकूण १० प्रांतांनी स्पर्धेत सहभाग घेतला. कनिष्ठ व वरिष्ठ गटातील ४० विद्यार्थ्यांनी आठ फेऱ्यांमध्ये प्रश्नोत्तरीत भाग घेतला. Agrasen Bhavan भारत दर्शन, अतुल्य भारत, विज्ञान, साहित्य, इतिहास, भूगोल, संविधान आणि चालू घडामोडी अशा विविध विषयांवरील प्रश्नांनी स्पर्धा रंगतदार झाली. संगणकीय प्रणाली व बझरच्या वापरामुळे रोमांचकता वाढली. समारोप समारंभात संध्या महाजन अध्यक्षस्थानी होत्या, तर स्मिता महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रश्नसंच देवगिरी प्रांतातील प्रसन्ना मांडे, उमेश पाटील आणि सीमाताई मुन्शी यांनी तयार केला.
सौजन्य: सीमा मुनशी/ शर्मिला चौरासिया, संपर्क मित्र