धनज बु. येथील पार्श्वनाथ जैन मंदीरात धाडसी चोरी

19 Nov 2025 12:45:20
कारंजा लाड,
jain temple theft कारंजा तालुक्यातील धनज बु. येथील पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदीरातून १९ किलो चांदीचा साज तसेच रोख ४० हजार रुपये असा जवळपास ५ लाख ४० हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याने कारंजा तालुयात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्राकडुन प्राप्त माहितीनुसार श्री पार्श्वनाथ श्वेतांबर मंदीर दरारेज सकाळी पूजेसाठी ६ वाजता उघडले जाते.
 
 
 

जैन मंदिर  
 
 
नेहमीप्रमाणे पूजारी मंदीर उघडण्यासाठी गेले असता मंदीराचे कुलूप त्यांना तुटलेले आढळले. त्यांनी ही माहिती मंदीराच्या विश्वस्त मंडळींना दिली. विश्वस्तांनी या संदर्भात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असताा मंदीरातील दानपेट्यातील अंदाजे ४० हजार रुपये तसेच मूर्तीवरील दोन चांदीचे मुकूट, ९ चांदीची छत्रे, तीन चांदीची तोरणे, चांदीचे दिवे,यंत्रे आणि चोवीसी असा एकूण जवळपास १९ किलो चांदीचा साज चोरीला गेल्याचे समोर आले.jain temple theft पोलिसांनी तातडीने अकोला येथील श्वान पथक, कारंजाचे फॉरेन्सिक तज्ञ, वाशीम येथील बोटे ठसे तज्ञ दाखल झाले. घटनास्थळाला स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठांनी भेट दिली. पुढील तपास कारंजाचे पोलिस निरीक्षक भारत वसंते करीत आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0