अनिल कांबळे
नागपूर,
brothel-started-in-a-house-in-tarodi वाठाेडा परिसरातील तराेडी येथील पंतप्रधान आवास याेजना येथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने धाड घालत एका दाम्पत्याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली. शंकर गणेशराव वानखेडे (38) आणि स्वाती उफर् मयुरी वानखेडे (34) ज्याेतीनगर, लष्करीबाग अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.
शंकर आणि स्वाती वानखेडे या दाम्पत्यांनी तराेडी येथे हे सेक्स रॅकेट सुरू केले हाेते. गरीब आणि गरजू मुलींना जाळ्यात ओढून तासाभरात एक हजार रुपये कमविण्याचे आमिष दाखविण्यात येते. स्वातीच्या आमिषाला अनेक आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या मुली बळी पडत हाेत्या. ती तराेडी येथील अड्डयावर आणून तिच्याकडून देहव्यापार करून घेत हाेते. शंकर हा आंबटशाैकीन ग्राहकांना शाेधून आणत हाेता. सामाजिक सुरक्षा विभागाला या देहव्यापाराच्या अड्डयाची माहिती समजताच पाेलिसांनी पाळत ठेवली. पाेलिसांनी आपल्या एका पंटरला या अड्डयावर पाठवून खात्री केली असता कुंटणखाना सुरू असल्याचे पंटरने सांगितले. त्यानंतर साेमवारी रात्री पंटर पुन्हा या अड्डयावर गेला. दीड हजारात साैदा केल्यानंतर त्याच्या ताब्यात एका तरुणीला साेपविण्यात आले. brothel-started-in-a-house-in-tarodi पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पाेलिस पथकाने या अड्डयावर धाड घातली. त्यावेळी वानखेडे दाम्पत्य तेथेच मिळून आले. दाेघांच्याही ताब्यातून दीड हजार रुपये, दाेन माेबाईल आणि इतर साहित्य असा 21 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाठाेडा पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवून वानखेडे दाम्पत्याला अटक केली आणि पीडित मुलीची सुटका केली. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक राहुल शिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.