‘माल और पुष्पा’ दोनोही मिल गये!

19 Nov 2025 19:26:14
चंद्रपूर, 
Cattle smuggling : एका पिकअप वाहनात निदर्यतेने कोंबून कत्तलीसाठी नेणार्‍या 9 गोवंशाची कोरपना पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशासह एकूण 5 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि आरोपींना अटक करण्यात आली. जे वाहन पकडण्यात आले, त्या वाहनामागे एक चित्रपटाचे पोस्टर लावले असून, त्यावर लिहिले होते, ‘माल मिलेगा तो पुष्पा नही मिलेगा, पुष्पा मिलेगा तो माल नही मिलेगा’! मात्र, या कारवाईत पोलिसांनी ‘माल और पुष्पा’ अर्थात, जप्तीचे साहित्य आणि आरोपी दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिस गंमतीने म्हणाले, हमको ‘माल और पुष्पा’ दोनोही मिल गये!
 
 
 
chand
 
 
कोरपना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका पिकअप वाहनात गोवंशांची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून तेथे आलेल्या पिकअप वाहनाला (एमएच 46 बीएफ 4954) अडवून पाहणी केली असता त्यात 9 गोवंश निर्दयतेने बांधलेले दिसले. या गोवंशांची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट होताचा पोलिसांनी 3 लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन व 90 हजार रुपये किंमतीचे 9 गोवंश असा एकूण 3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरूध्द कोरपना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0