विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता...सीईटी आता वर्षातून तीन वेळा

19 Nov 2025 12:07:07
मुंबई,
CET now held three times a year महाराष्ट्रात सीईटी परीक्षा आता वर्षातून तीन वेळा होणार. जेईई मेन्सच्या मॉडेलवर आधारित हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अधिक संधी मिळणार आहेत. २०२६ मध्ये एप्रिल, मे आणि डिसेंबर महिन्यात ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माहितीनुसार, २०२६ मध्ये पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वर्षात तीन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील परीक्षांमधून २०२६ च्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. डिसेंबर २०२६ आणि एप्रिल २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षांमधून पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
 
 

cet paper 
विद्यार्थ्यांना एका वर्षात एकापेक्षा अधिक परीक्षा देण्याची सुविधा मिळाल्यामुळे, ज्या परीक्षेत जास्त गुण मिळतील, तीच प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्याची संधी मिळेल आणि गुणात्मक सुधारणा करण्याचीही संधी राहील. गेल्या अनेक वर्षांपासून सीईटी सेलकडे वर्षात दोन वेळा परीक्षा घेण्याची मागणी करण्यात येत होती. जेईई मेन्ससारखा मॉडल लागू केल्याने हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एक परीक्षा देणे बंधनकारक राहील, तर दुसरी परीक्षा ऐच्छिक राहणार असून, विद्यार्थ्याला त्यापैकी ज्यामध्ये चांगले गुण मिळतील, ती प्रवेशासाठी मान्य राहील. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अधिक संधी, तणावमुक्त परीक्षा आणि गुणात्मक उन्नती साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
Powered By Sangraha 9.0