सिलिंडरला गळती, घराची राखरांगोळी

19 Nov 2025 17:44:49
सिंदी (रेल्वे),
cylinder leaks घरगुती गॅस सिलिंडरला गळती लागल्याने धीरज नेहारे यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील दोन खंडी कापूस आणि जिवनोपयोगी साहित्यांची राख रांगोळी झाली. ही घटना मंगळवार १८ रोजी सेलडोह येथे घडली. सेलडोह येथील धीरज नेहारे यांनी नव्याने आणलेला गॅसच्या हंड्याला गळती लागली.
 

आग  
 
 
ही बाब कुटुंबातील कुणाच्याच लक्षात आली नाही. दरम्यान, धीरज यांच्या पत्नीने सकाळी गॅस पेटवताच हंड्याने पेट घेतला आणि क्षणात भडका होऊन घर पेटले. यात घरातील ११ विंटल कापूस आणि जीवनोपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली. प्रेमचंद खंगारे या युवकाने हिंमत दाखवत सिलिंडर बाहेर फेकून विझवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सिंदी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.cylinder leaks अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझविली. मात्र, तोपर्यंत घरातील सर्व साहित्यांची राखरांगोळी झाली. या घटनेत धीरज नेहारे यांचे किमान १२ लाखांचे नुकसान झाले. घटनेचा महसूल विभाग व पोलिसांनी पंचनामा केला. आगग्रस्त कुटुंबाला पालकमंत्र्यांनी तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0