बाभुळगाव,
death-after-falling-into-a-well : तालुक्यातील दाभा येथील एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजताचे सुमारास घडली. सचिन माधव शेंडे (वय 42, दाभा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची तक्रार 18 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आली. या प्रकरणी त्याचा धाकटा भाऊ ओमकिरण शेंडे याने बाभुळगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सचिन शेंडे याला मानसिक आजाराचा त्रास होता. घटनेच्या दिवशी गावातील काही इसमांना दाभा शिवारातील विहिरीत एक व्यक्ती पडलेली दिसली. त्याची माहिती गावातीलच प्रशांत अतकरी यांना देण्यात आल्याचे सांगितले.