दारव्हा,
darvha-municipal-council-elections : नगरपरिषद निवडणुकीसाठी 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर अध्यक्षपदासाठी 17 नोव्हेंबरपर्यंत दाखल झालेल्या एकूण 27 अर्जापैकी 13 अर्ज बाद झाले असून 14 उमेदवार रिंगणात कायम आहेत. तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 162 अर्जापैकी तब्बल 64 अर्ज बाद झाले असून 98 उमेदवारांची नावे कायम आहेत. अध्यक्षपदासाठी 14 उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहे. तर नगरसेवक पदासाठी 98 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आणखी किती उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार घेणार यावर दारव्हा नगरपरिषद निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.