वाशीम,
dc kumbhejkar बालविवाह हा कायदेशीर गुन्हा आहे. तसेच सामाजिकदृष्ट्या बालविवाह ही अत्यंत घातक प्रथा आहे. ती थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बालविवाहमुक्त महाराष्ट्र - आपला संकल्प अभियान’ अंतर्गत बालविवाह मुक्त जिल्हा स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे, परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे बोलताना म्हणाले की, जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण शून्य करणे हा आपला संकल्प असावा. यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे म्हणाले,बालविवाह रोखणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. बालविवाह प्रतिबंध ही एक लोकचळवळ व्हावी. बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी आहे. बालकांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा आणि स्वप्नांच्या पूर्ततेचा मार्ग बालविवाहामुळे खुंटतो. त्यामुळे गावपातळीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत सर्वांनी सजग राहून अशा घटनांना वेळीच आळा घालणे अत्यावश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.dc kumbhejkar यावेळी बालसंरक्षण अधिकारी लक्ष्मी काळे, संरक्षण अधिकारी भगवान ढोले, तालुका संरक्षण अधिकारी धिरज उचित, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन १०९८ चे सर्व कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी स्वाक्षरी अभियानात सहभाग घेतला.